Ahmednagar Politics : आगामी विधासनभेच्या अनुशंघाने आता सर्वच पक्ष व कार्यकर्त्यांनी कम्बर कसली आहे. दरम्यान मागील दोन वर्षात झालेल्या बंडखोरी मुळे राजकीय वातावरण वेगळेच आहे. नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख हे मात्र राजकीय बंडाच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले.
दरम्यान आता त्यांनी आगामी निडणुकांच्या अनुशंघाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यांनी घोंगडी बैठका घेण्यास सुरवात केली आहे. त्यांनी नुकतेच नेवासा तालुक्यातील मुळाथडी परीसरातील खेडलेपरमानंद, शिरेगाव, पानेगाव, करजगाव येथे घोंगडी बैठका घेतल्या.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याने आमदार शंकरराव गडाख यांनी गावोगावी शेतकरी, कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान विविध विषयांवर विचारमंथन होत आहे. तालुक्यात मंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेली विकासकामे जनतेपुढे मांडत असून द्वेषाची भूमिका घेऊन भाजप सरकारने अनेक मंजूर कामांना स्थगिती दिल्याने तालुका विकास कामांपासून वंचित राहिला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिल्याने तालुका दूध संघाला टाळे ठोकण्यात आले. मुळा शैक्षणिक संस्थेमागे चौकशीचा ससेमिरा लागला, मुळा बँक, मुळा साखर कारखान्यासमोर अडचणी निर्माण करण्यात आल्या.
मात्र त्या दबावाला गडाख घाबरले नाही, उलट सामोरे गेले. तालुक्यातील मंजूर केलेली ७० कोटींची विजेची कामे, सुमारे ९० कोटींच्या रस्त्यांच्या कामाला स्थगिती मिळाली, तसेच नवीन निधीतही डावलेले गेले, पण गडाखांनी एकनिष्ठ राहत थेट जनतेच्या कोर्टात धाव घेतली आहे.
राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार राज्यात येणार असून आमदार गडाखांच्या रुपाने पुन्हा नेवासे तालुक्याला लाल दिवा मिळणार असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखविल्या. आमदार गडाखांच्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी तालुक्यात गंभीर झालेल्या विजेच्या समस्यांबरोबरच दूध भाव, मागील वर्षी झालेल्या पावसाने कपाशी,
सोयाबीन नुकसान भरपाई, पीक विम्यापासून मोठ्या संख्येने शेतकरी वंचित राहिले असून रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेतल्याशिवाय भाजप सरकारला जाग येणार नसल्याचे शेतकऱ्यांनी चारही गावांत आमदार गडाख यांना बैठकीदरम्यान सांगितले.