शिर्डी मतदार संघातील ते ‘३३ + २६’ गावे विखे पाटलांच्या विरोधात जातील? आमदारकीची वाट खडतर? पालकमंत्र्यांना धाकधूक

अहमदनगरचे राजकारण म्हटले की विखे - थोरात हे नाव आलेच. ओघाने दोघांचाही राजकीय संघर्ष आलाच. या दोन दिग्गजांशिवाय अहमदनगरचे राजकारण कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आता आगामी विधानसभेलाही हे दोघेच एकमेकांचे टेन्शन ठरतील असे दिसते.

Published on -

Ahmednagar Politics : अहमदनगरचे राजकारण म्हटले की विखे – थोरात हे नाव आलेच. ओघाने दोघांचाही राजकीय संघर्ष आलाच. या दोन दिग्गजांशिवाय अहमदनगरचे राजकारण कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आता आगामी विधानसभेलाही हे दोघेच एकमेकांचे टेन्शन ठरतील असे दिसते.

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांचा झालेला पराभव व खासदार नीलेश लंके यांच्या विजयात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची मोठी भूमिका असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे आता विधानसभेला विखे विरुद्ध थोरात राजकीय संघर्ष संगमनेर आणि शिर्डी या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत नव्याने पाहायला मिळणार आहे.

ही सगळी गणिते पाहता आता नागरिक शिर्डी विधानसभेच्या चर्चा करायला लागले आहेत. आगामी काळात शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील उभे राहतील. त्यामुळे तेथे त्यांच्यासाठी कोणती आव्हाने असतील याची चर्चा नागरिक करत आहेत.

काही नागरिकांच्या मते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील १९९५ पासून येथे आमदार आहेत. परंतु यंदाची आमदारकीची वाट खडतर असल्याचे ते म्हणतात. यात ते ‘३३ + २६’ गावे विखे पाटलांच्या विरोधात जातील? अशी चर्चाही आहे. कोणती आहेत ही गावे? पाहुयात..

२६ गावे
संगमनेर तालुक्यातील २६ गावे विखे यांच्या मतदारसंघात असल्याने तेथे थोरातांचा प्रभाव आहे. हे दोन्ही नेते पूर्वी एकाच पक्षात काँग्रेसमध्ये असताना विखे-थोरात यांच्यात संघर्ष जरी असला तरी निवडणुकीच्या काळात पक्षाशी बांधीलकी ठेवत ते एकमेकांना मदत करण्याचे धोरण घेत होते.

आज विखे भाजपमध्ये, तर थोरात काँग्रेसमध्येच आहेत. वेगवेगळ्या पक्षांत असल्याने एकमेकांच्या मतदारसंघांत आपल्या पक्षाची ताकद दाखविणे ही त्यांची राजकीय गरज आहे. त्यामुळे ही २६ गावे विखेंच्या विरोधात काम करतील का अशा चर्चा नागरिक करत आहेत.

३३ गावे
कोल्हे व थोरात यांनी एकत्रित येत गणेश सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविली. या कारखान्यात शिर्डी मतदारसंघातील सरासरी ३३ गावे आहेत. त्यामुळे येथेही ही गावे विखेंच्या विरोधात काम करतील का अशा चर्चा नागरिक करत आहेत.

विखे पाटीलही धुरंदर
पालकमंत्री विखे पाटील हे या मतदार संघात १९९५ पासून आमदार आहेत. त्यामुळे येथे त्यांची मोठी पकड आहे. तसेच ते देखील धुरंदर राजकारणी आहेत. त्यांची राजकारण करण्याची पद्धतही युनिक असते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर मात करत तेही विजयश्री खेचून आणतील असे नागरिक म्हणतात.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe