Ajit Pawar : सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. अजित पवारांनी राणेंवर टीका केल्यानंतर राणे देखील आक्रमक झाले तसेच त्याने अजित पवारांनी माझ्या नादाला लागू नये मी बारा वाजवेल असे म्हटले होते.
असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. नारायणराव राणे तुमचे आव्हान राष्ट्रवादीने स्वीकारले आहे. आपण बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजून दाखवाच. असे प्रतिआव्हान पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी राणेंना दिले आहे.
यामुळे आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे. एका व्हिडिओमध्ये नारायण राणे यांचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वीकारत आहे. तुम्ही बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजून दाखवा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, युवक, महिला तुमचे बारामतीत स्वागत करण्यास उत्सुक असतील, असे ते म्हणाले.
दरम्यान, नारायण राणे यांच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या या इशाऱ्याची खिल्ली उडवत अजितदादा सोडा, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता तुमचे आव्हान स्वीकरतो, असे म्हटले होते. यामुळे हा वाद वाढत जात आहे. अजित पवारांनी नारायण राणे यांची ‘राणेंना एका बाईनं पाडलं’ अशी खिल्ली उडवली होती.
या नंतर राणे कुटूंबीय पवार यांच्यावर तुटून पडले. तसेच नारायण राणे यांनी अजित पवार यांना आव्हान देत माझ्या फंद्यात पडू नका. नाही तर मी पुण्यात, बारामतीत येऊन तुमचे बारा वाजवीन, असा इशारा दिला होता.
यामुळे हा वाद आता अधिकच चिघळणार आहे. नारायण राणे यांना चिमटा काढताना अंकुश काकडे यांनी ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठे केले, मुख्यमंत्रीपद दिलं, त्या शिवसेनेला सोडून आता तुम्ही भाजपसोबत गेला आहात, असे म्हणत टीका केली.