Ajit Pawar : वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरसह अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पॉलिटिकल अजेंडा काय आहे हे आता नागालँडमधील भाजपसोबतच्या युतीमुळे समोर आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपला मदत हे रोहित पवार यांचे काकाच करतात. त्यांनी भाजपसोबत किती युत्या केल्या आहेत. पहाटेचे शपथविधी कसे केले आहेत. आता नागालँड मधील राजकारणही पुढे आले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर आरोपर करण्यात काय अर्थ नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

तुमचा पॉलिटिकल अजेंडा मात्र जगासमोर आला आहे अशी टीका रेखाताई ठाकूर यांनी केली आहे. वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना वाद्यावर टीका टिप्पणी केल्यामुळे राष्ट्रवादी आणि वंचितचा वाद वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सध्या राज्यातील राजकारण अर्थसंकल्पीय अधिवेशनापुढं घुटमळत असलं तरी नवे जुने आरोप प्रत्यारोप उखरून काढले जात आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुणे पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही भाजपला मदत करत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यावर रेखाताई ठाकूर यांनी ही त्यांची जुनी टीका आहे असल्याचे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केला आहे.