Ajit pawar : अंकल अंकल काकीला सांगीन! अजित पवारांची सभागृहात टोलेबाजी, गिरीश महाजन शांतच झाले…

Ahmednagarlive24 office
Published:

Ajit pawar : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येत आहेत. यामुळे सभागृहात रोज अनेक किस्से घडत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश महाजन यांनी चांगलेच सुनावले आहे.

सध्या शेतकरी अडचणीत आला आहे. यामध्ये कांद्याचे दर आणि कापसाच्या दरावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावर बोलताना अजित पवार यांनी भाजप नेते गिरीज महाजन यांना खोचक टोला लगावला आहे. यामुळे एकच हशा पिकला.

अजित पवार बोलत असताना महाजन मध्येच बोलले, याचवेळी अजित पवार यांच्या पाठिमागे बसलेल्या धनंजय मुंडे यांनी महाजन यांना अंकल अंकल म्हणत चिडवले. यावर अजित पवारही आपल्या भाषणात म्हणाले, अंकल अंकल काकीला सांगीन. मग किती काकी आहेत ते बघाव लागेल. असे म्हणत महाजनांना टोला लगावला.

यामुळे सभागृहात हशा झाला. दरम्यान कांदा दराच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले. त्यांनी आज विधानसभेच्या पायऱ्यांवर कांदा आणि कापूस घेऊन घोषणाबाजी केली. अजित पवारांनी देखील सरकारवर टीका केली.

दरम्यान, यावेळी अजित पवार, एकनाथ खडसे, छगन भुजबळ यांनी सरकारवर यावरून निशाणा साधला. सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तसेच शेतकरी आत्महत्या देखील करत आहेत. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe