Ajit Pawar : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होणार असून त्यासंदर्भात विरोधी पक्षांनी आज रणनिती बैठक घेतली. यावेळी नुकताच शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत झालेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका होत आहे. यामुळे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.
यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्षाचे नाव शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेतले गेले. नंतर ते एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा पक्षःपातीपणाचा असल्याची भावना लोकांमध्ये असल्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले, ४० आमदार आणि काही खासदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मनसे या पक्षाचा पुरावा देत म्हटले उद्या मनसेचा एक आमदार आहे.
त्यांनी उद्या पक्षावर दावा केल्यास पक्ष त्यांचा होणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे सध्या त्यांची चर्चा सुरू आहे. दरम्यान अधिवेशनात विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याची रणनीती तयार केली आहे.
काल विरोधी पक्षांनी म्हणजेच महाविकास आघाडी सरकारची बैठक पार पडली. यावेळी अजित पवारांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे आहे. यामुळे अधिवेशनात सरकारची मोठी कसरत असणार आहे. यामुळे किती कामकाज होणार हे लवकरच समजेल.