Ajit pawar : गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलताना काही चुका होत आहेत. यामुळे त्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे याची बरीच चर्चा होते. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना mpsc बाबतीत प्रश्न विचारला ते म्हणतात की, निवडणूक आयोगाकडे पाठवतो. राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही. मी मुद्दाम बोलतोय. आपल्याकडून पण बोलताना एकदा चूक होते. मुख्यमंत्र्यांकडून चार चार वेळा चूक झाली.

असे असताना हे चार वेळा निवडणूक आयोग, निवडणूक आयोग म्हणत होते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच महागाईवरून देखील अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘पेट्रोल, डिझेल, सिमेंट, स्टील, गॅस, दुचाकी यांची 2014 चे दर आणि आत्ताचे दर किती आहेत.
मी सांगतोय घड्याळाकडे बघा तर तुमचं काय? कमळाबाई, कमळाबाई करताय मग घ्या आता. आता कसं वाटतंय, गार-गार वाटतंय. स्वयंपाक करताना कसं, बरं वाटतंय का?’ असं ही अजित पवार म्हणाले, असेही म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान, सध्या पुण्यात पोट निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचारासाठी सर्चच बडे नेते पुण्यात तळ ठोकून आहेत. यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल. महाविकास आघाडीने ही निवडणूक चुरशीची केली आहे. यासाठी रविवारी मतदान पार पडणार आहे.