Ahmednagar Politics : शरद पवारांना शह देण्याचा अजित पवारांनी चंगच बांधला ! अहमदनगरच्या बालेकिल्ल्यात ‘त्या’ बड्या नेत्याला आमदारकी देऊन भूकंप घडवणार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा तसा शरद पवार अर्थात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. आजवर राष्ट्रवादीचे वर्चस्व अहमदनगर जिल्ह्यात राहिले आहे. मागील विधानसभेला बहुतांश आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले.

अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यात शरद पवार यांनी विशेष वर्चस्व ठेवले. येथील कारखानदार, ‘बडे’नेते, तसेच आमदारही बहुतांश वेळा राष्ट्रवादीचाच राहिला. परंतु आता शरद पवार यांच्याशी फारकत घेतलेले अजित पवार आता पक्ष व संघटन मजबुतीकरणाला लागले आहेत.

आता त्यांनी अहमदनगर वर लक्ष केंद्रित केलेलं दिसत आहे. त्यात शरद पवार यांचा बालेकिला श्रीगोंदे तालुक्यातही आता अजित पवार यांनी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

पहा नेमकं काय घडतंय?

राज्य साखर संघाचे अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव नागवडे यांचा जयंती सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी सोमवारी निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली असल्याचे वृत्त आहे.

 श्रीगोंद्यातील नेत्याची फळी लागली कामाला

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर अजित पवार श्रीगोंद्यात तगड्या उमेदवाराचा शोध घेत आहेत. आता श्रीगोंद्यात अजित पवार गटाची ताकद वाढविण्यासाठी पवार व राजेंद्र नागवडे यांच्यात समेट घडून आणण्यासाठी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

अजित पवार व राजेंद्र नागवडे यांच्यात समेट घडून आणण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून रणनीती आखली जात आहे. मागील आठवड्यात राजेंद्र नागवडे व नाहाटा यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली होती.

त्यामुळे आता अजित पवारांची ताकद श्रीगोंद्यात वाढवण्यासाठी मोठ्या नेत्यांनीही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रीगोंद्यात राजकीय भूकंप होईल अशी चर्चा आहे.

 बबनराव पाचपुतेंना शह देण्यासाठी मोठी खेळी

राजेंद्र नागवडे याना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी लागेल अशी चर्चा झाल्याचे समजते. विधानसभेच्या दृष्टीने नाहाटा हे पवार आणि नागवडे यांच्यात मध्यस्ताची भूमिका निभावत आहेत.

लोणीव्यंकनाथ ग्रामपंचायत निवडणुकीपासून नाहाटांनी नागवडेंशी जुळवून घेतले असलयाचे दिसते. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोलेची जागा भाजपला देऊन त्या बदल्यात श्रीगोंद्याच्या जागेवर अजित पवार गट दावा करणार असल्याचे बोलले जात आहे. नाहाटांनी पाचपुतेंना चेकमेट देण्यासाठी जाळे टाकले असून सध्या ते राजेंद्र नागवडे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe