Ajit Pawar : सध्या राज्याचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले. असे असताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा डोळा मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
अधिवेशन काळात त्यांचा एक वेगळाच रुबाब बघायला मिळतो. आता मंत्री शंभूराज देसाई यांना बुक्की मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याबाबत नेमकं काय घडलं हे अनेकांना समजले नाही.

आपल्या मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी आमदार फारुख शेख यांनी विधानभवनाच्या पाऱ्यावर आज आंदोलन केले. यावेळी हे आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यासाठी मंत्री तेथे आले होते. यावेळी इतरही आमदार उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी आपला हात अजित पवार यांच्यामागे नेला. लगेच अजित पवारांनी देसाई यांच्या पायावर बुक्की मारली. त्यानंतर दोघंही हसले. एक चेष्टा मस्करी म्हणून दोघांनी हे कृत्य केले.
त्यांच्या या मस्करीचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा डोळा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे अजित पवार सतत चर्चेत असतात.