Ajit pawar : पुण्यातील पोट निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. 2 तारखेला हा निकाल लागणार आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालाआधीच पुण्यात विजयाचे बॅनर लागले आहेत.
असे असताना आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात विरोधकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, पुण्यातील पोटनिवडणुकीचा निकाल लागला ना, तर तुमचं आहे ते पण जाईल. गिरीश महाजन यांच्यासह सर्वांना तीन-तीन ते चार-चार दिवस बसाव लागल ना.
तसेच त्या ठिकाणी काय काय घडलं, त्यावर आज मी बोलणार नाही. एकदा निकाल लागू द्या. मग सांगतो की पुणे आणि चिंचवडमध्ये काय घडल. कुठ काय सापडल. मतदानाला जाऊ नका, म्हणून कोण सांगत होत.
मतदानाला जाणाऱ्यांना कोण काय सांगत होतं, ते सर्व मी उघड करणार आहे, असा इशाराच अजित पवारांनी दिला आहे. यामुळे अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मी मतदारांचा आदर करणारा माणूस आहे. पुण्याचा निकाल दोन तारखेला काय होईल. पुण्याचा निकाल काय लागेल हे मला सांगता येत नाही. मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना याठिकाणी ठाण मांडून बसावे लागले.
तसेच या सरकारला शिक्षक व पदवीधर निवडणुकीत जबरदस्त चपराक बसली आहे. ते मतदान फक्त एका विभागात झालेले नाही. सगळीकडे झाले. यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले, असेही अजित पवारांनी सांगितले.