Ajit pawar : अजितदादांनी रात्रीचा दिवस करूनही चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा मोठा पराभव? एक्झिट पोल आला समोर

Ahmednagarlive24 office
Published:

Ajit pawar : स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल 2 तारखेला लागणार आहे. यामध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल तानाजी कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. असे असताना आता चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल नुकताच समोर आला आहे. या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२ तारखेला होणाऱ्या मतमोजणी वरून सर्व गोष्टी समोर येतील. याबाबत तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केलेला असला तरी एक्झिट पोलने मात्र वेगळेच चित्र दाखवले आहे. कसब्यात मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल असे म्हटले जात आहे.

चिंचवडमध्ये अश्विनी लक्ष्मण जगताप भाजप ४५% – ४७%, तसेच नाना काटे राष्ट्रवादी : ३१% – ३३% आणि राहुल कलाटे अपक्ष १८% – २०% असे मतदान होण्याची शक्यता आहे. आता 2 तारखेला सगळं समोर येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe