तुम्हालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते का ? अजित दादा म्हणतात, “सगळ्यांना आपले नेते मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं, पण….”

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांचे एक विधान चर्चेत आले आहे. खरे तर संपूर्ण गणेशोत्सव अजित दादा नामानिराळे राहिले होते. अजित दादा आणि गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याच मंडळाला हजेरी लावली नाही हे विशेष.

Ajit Pawar News

Ajit Pawar News : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्यात, मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेत. यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुतीच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.

महाविकास आघाडीचे नेते देखील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आगामी विधानसभेसाठी कंबर कसून सज्ज झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांचे एक विधान चर्चेत आले आहे. खरे तर संपूर्ण गणेशोत्सव अजित दादा नामानिराळे राहिले होते. अजित दादा आणि गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याच मंडळाला हजेरी लावली नाही हे विशेष.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असतानाही अजित दादा कुठेचं चमकले नाहीत. यामुळे, विविध चर्चांना उधाण आले होते. पण, काल अर्थातच सोमवारी अजित दादांनी काही मंडळांना हजेरी लावली. त्यांनी मुंबईतील लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आदी मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यातील मंडईत दाखल झालेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांना आपले नेते मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं, असं म्हटलं इतक्यात पत्रकारांनी तुम्हालाही वाटतं का? असं म्हणतं टोकलं. त्यावर सगळ्यांना वाटतं म्हटल्यावर त्यात दादाही आलाच.

सगळ्यांचं मत असतं, मात्र सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होते असं नाही. मात्र त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा अधिकार मतदारांच्या हातात असतो. आणि ते ठरवतात तसंच १४५ ची फिगर असणं देखील आवश्यक आहे, असं अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना दादांनी महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्हा सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. आत्ताच्या विधानसभा निवडणुका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत असही स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe