Ajit Pawar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. यामुळे आघाडीचे नेते पूर्ण जोमाने आगामी निवडणुकांच्या कामाला लागले आहेत.
महायुतीने देखील आलेल्या पराभवातून धडा घेत आता निवडणुकीचे काम सुरू केले आहे. अजून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप झालेले नाही. दोन्ही गटात जागा वाटपाबाबत सध्या चर्चा सुरू आहेत मात्र या चर्चा अजून फायनल झालेल्या नाहीत.
मात्र जागा वाटपावरून दोन्ही गटात समाविष्ट असणाऱ्या पक्षांमध्ये वाद-विवाद होत असताना दिसतय. अशातच, महायुतीमध्ये समाविष्ट असणारा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट महायुतीची साथ सोडणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक भूकंप येणार की काय अशा चर्चांना उधाण आले आहे.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित दादा यांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित नशीब आजमावले. मात्र महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही.
आता विधानसभा निवडणुकीत मात्र अजित दादा हे स्वातंत्र निवडणूक लढवतील असे बोलले जात आहे. कारण की, या संदर्भात शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एक सूचक विधान केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का ? असा प्रश्न नीलम गोऱ्हे यांना केला असता, त्यांनी “पत्रकारांनी अलर्ट राहा. कारण तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देताना धावपळ होईल. महाराष्ट्राचे राजकारण खूप वेगाने बदलत आहे.
त्यामुळे आत्ताच त्यावर भाष्य करणे योग्य नाही. आमचे लोक सगळीकडे लढायला तयार आहेत. भाजप आणि शिवसेनेची खूप वर्षांची युती आहे. त्यामुळे मला वाटत नाही आमच्यात कुठले प्रश्न येणार आहेत”, असं म्हणतं अजित पवार हे महायुती मधून बाहेर पडणार असे सूचक विधान केले आहे.
नीलम गोऱ्हे यांनी असं वक्तव्य केल्यानंतर एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने मग अजित पवार स्वतंत्र लढणार का ? असा काउंटर क्वेश्चन केला. यावर उत्तर देताना “मी असं काहीही बोलले नाही. माझ्या तोंडी घालू नका. पण राजकारण बदलत आहे.”, असे स्पष्ट करत अजित पवार हे महायुतीची साथ सोडू शकतात असे संकेत दिले आहेत.