Vikhe Patil On Rahul Gandhi : येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने देखील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
मंत्री विखे पाटील यांनी, ‘राहुल गांधी हे सकाळी एक आणि सायंकाळी एक, असे बोलताना दिसतात. त्यांना देशात काय बोलाव आणि देशाबाहेर काय बोलावं, याचं देखील भान राहत नाही. ते देशाबाहेर आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात.
पण, ते आता देशात आल्या बरोबर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची भाषा करू लागले आहेत. पण, महाराष्ट्रातील जनता काँग्रेस आणि राहुल गांधींच्या फसव्या धोरणांना बळी पडणार नाही’, असं म्हणत राहुल गांधी यांच्या धोरणांवर आणि काँग्रेसच्या धोरणांवर जोरदार निशाणा साधत गांधी यांना टार्गेट केले आहे.
मराठा समाजाला फक्त आणि फक्त भाजपाच आरक्षण देणार
एवढेच नाही तर मराठा समाजाला फक्त भाजपाचे आरक्षण देऊ शकते असा दावा आणि विश्वास यावेळी मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तसेच विखे पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेते आरक्षणासंदर्भात वेगवेगळी भूमिका मांडत आहेत आणि या संदर्भात त्यांच्या नेत्यांकडून वेगवेगळी विधाने समोर येत आहेत असेही म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात की केंद्राने मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायला हवा. शरद पवार थेट आरक्षणचं देता येणार नाही असा युक्तिवाद करतात.
दुसरीकडे काँग्रेस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठीशी उभे नाहीये. यामुळे आता महाविकास आघाडी मधील नेत्यांची आरक्षणाबाबतची भूमिका उघड पडू लागली आहे.
एवढेच नाही तर यावेळी मंत्री विखे पाटील यांनी काँग्रेसचा आरक्षणासंदर्भात कोणताच अभ्यास नसल्याची बोचरी टीका देखील केली आहे. त्यामुळे सध्या मंत्री विखे पाटील यांच्या या वक्तव्याची नगरसहित राज्यात चर्चा पाहायला मिळत आहे.