Ajit Pawar : आमचाच माजी आमदार फुटला! ठाकरेंच्या सभेच्या गर्दीवर अजित पवारांचे वक्तव्य..

Published on -

Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेमुळे कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी खेड येथे सभा घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकं जमली होती. यावरून अनेकांनी वेगवेगळी वक्तव्य केली आहेत.

असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी सभेला गर्दी जमवली, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे वातावरण तापले आहे. यावर आता अजित पवार यांनी एक वक्तव्य केले आहे.

पवार म्हणाले, विरोधक म्हणत आहेत की उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेला आम्ही गर्दी जमवली. पण आमचाच माजी आमदार संजय कदम फुटला आहे. संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला आणि आम्ही कशाला गर्दी जमवू?, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

अजित पवार अहमदनगर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानावरून सरकारवर जोरदार टीका केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन, काद्यांचे दर, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी अनुदान अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली.

तसेच ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना न देता एकनाथ शिंदे यांना दिली. पण महाराष्ट्रातील जनतेला हे आवडलेले नाही, असेही ते म्हणाले. सध्या अधिवेशनात शेतकरी प्रश्नांवरून अजित पवार शिंदे सरकारवर टीका करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe