Ajit Pawar : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजित पवार यांच्यामुळेच होत नाही, असे उपरोधिक वक्तव्य माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे. अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही. असे खोचक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.
सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. विरोधकांकडूनही वारंवार विस्ताराबाबत बडे दावे करण्यात येत आहेत. अनेक आमदार यासाठी इच्छुक आहेत. सध्या एका एका मंत्र्यांकडे अनेक खाती देण्यात आली आहेत. दरम्यान यासाठी सदाभाऊ खोत यांनी अजित पवार यांनाच कारणीभूत ठरवले आहे.
ते म्हणाले, अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, सात महिने झाले तरी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, यावरून अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. नऊ महिन्यात बाळ जन्माला येत, पण इथे सरकारला सात महिने झाले तरी विस्तार होत नाही, असे ते म्हणाले होते.
तसेच रविकांत तुपकर यांच्या आंदोलनावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोलिसांनीही संयम बाळगावा. एखादा दगड शेतकऱ्यांनी मारला असेल तर समजून घेऊ शकतो, कारण ती पोटातली आग असते.
शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने जाणून घ्यावेत, चर्चेतूनही मार्ग काढला जाऊ शकतो, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. तुपकर सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत.