Ajit Pawar : पुण्यात काल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली होती. परखड मत व्यक्त करणारे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. मात्र पुण्यात माध्यमांचे कॅमेरे बघताच तडका-फडकी निघून गेले.
बैठक संपल्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देतील, अशी आशा होती. पण अजित पवार आले, त्यांनी कॅमेरे पाहिले आणि इतक्यात वेगाने पावलं टाकत तिथून निघून गेले, त्यांनी कुणाशीही बोलायला नकार दिला.

यामुळे नेहेमी पत्रकारांना वेळ देणारे दादा आज असे कसकाय निघून गेले असा प्रश्न अनेकांना पडला होता. येथील बैठक संपल्यानंतर ते लिफ्टमधून खाली आले. तेव्हा माध्यमांचे कॅमेरे पाहून त्यांनी चालण्याचा स्पीड एकदम वाढवला.
तसेच कुणाकडेही न पाहता ते तडक निघाले. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केले. अजित पवार यांच्यासोबतच्या 2019 च्या पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठा गौप्यस्फोट केलेला. शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या.
त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्या गौप्यस्फोटाबद्दल अजित पवार गेल्या तीन दिवसांपासून काहीच बोलले नाहीत. यासाठी अजित पवार तेथून निघून गेले का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.