Ajit Pawar : उद्धव ठाकरे येताच डोळा का मारला? अजित पवारांनी सांगितले खरे कारण

Published on -

Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे येताच डोळा मारल्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत आता अजित पवार यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, उद्वव ठाकरे आले आणि ते आल्यावर मी डोळा मारला म्हणजे मी त्यांच्याबद्दलच डोळा मारलाय काय.

हे काय बरोबर नाही. राज ठाकरे यांनीही माझ्या डोळा मारण्याची नोंद घेतली. कशाचा कशाला मेळ नाही. मी खरं तर त्यावेळी एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधीला मी तो डोळा मारला होता, असे स्पष्टीकरणही अजित पवार यांनी दिले आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

अजित पवार म्हणाले, चुकून एखादा डोळा आपण बंद केला तर डोळा मारला. डोळा मारला. डोळा मारला. अशी चर्चा होते. मी आणि उपमुख्यमंत्री विधानमंडळात उभे होतो. त्यावेळी त्यांनी नाना पटोले यांना डोळा मारला. त्या ठिकाणी कॅमेरे नव्हते, म्हणून बरे झाले, असेही अजित पवार म्हणाले.

अनेकदा त्यातून अर्थ काहीही निघतो. दरम्यान, तेव्हा अजित पवार हे माध्यमांशी बोलत होते. मात्र, ठाकरे आल्यामुळे ते बाजूला झाले, बाजूला होत असताना त्यांनी डोळा मारला होता. याबाबत मोठी चर्चा रंगली होती.

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अलिकडे तर व्हिडिओ कॉल करून बोलण्याची पद्धत रुढ होत आहे. त्यामुळे काय करायचं, हे कळतंच नाही. याबाबत काळजी घेण्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe