Ajit Pawar : २०१४ ते २०१९ मध्ये भाजपमध्ये गेलेले सगळेच माघारी येणार? अजित पवारांच्या वक्तव्याने भाजपची उडाली झोप…

Published on -

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे भाजपची झोप उडण्याची शक्यता आहे. अजित पवार म्हणाले, मागील काही वर्षांत भाजपमध्ये गेलेले ४० ते ४५ नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. येत्या काळात आपल्या पक्षनेतृत्वाला सांगून त्यातले काही आमदार मूळ पक्षात प्रवेश करु शकतात.

यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे. 2014 ते 2019 मध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक नेते भाजपमध्ये गेले. यामुळे राज्यातील सत्ता देखील गेली. अजित पवार म्हणाले, शेवटी माणसांकडूनच चुका होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, आपल्या हक्काची काही मते तसेच काही पक्षाची मते यांच्या भरोशावर निवडून येणं त्याकाळी संबंधित नेत्यांना सोप गेलं.

भाजपमधील अनेक आमदारांची येत्या काळात घरवापसी बघायला मिळू शकते, असेही पवार म्हणाले. आमच्यातले काही नेते २०१४ ला आम्हाला सोडून गेले, काहींनी २०१९ ला पक्ष बदलला. २०१४ ला भारतीय जनता पक्षाने एक असे चित्र निर्माण केल की नरेंद्र मोदींचा करिश्मा संपूर्ण भारतावर निर्माण झाला आहे.

शेवटी एखाद्या आमदाराला मतदारसंघाचा विकास करायचा असतो. त्याला जनतेला कामे दाखवायची असतात, यासाठी अनेकजण पक्ष सोडून गेले. पण सध्या परिस्थिती बदलली आहे. यामुळे अनेकजण आता मूळ पक्षात येण्याची शक्यता असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

सोडून गेलेले त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना सांगू शकतात. आमची चूक झाली. शेवटी माणसांकडूनच चुका होतात. तालुक्याचा-जिल्ह्याचा विकास व्हावा, म्हणूनच लोक पक्ष सोडण्याचे निर्णय घेत असतात. राजकारणात कालचा शत्रू आज मित्र असतो आणि आजचा मित्र उद्या शत्रू असतो, असेही अजित पवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe