Ahmednagar Politics : अक्षय कर्डिलेंनी वडिलांचा वारसा पुढे घेवून जावा !

Published on -

Ahmednagar Politics : ग्रामीण भागातील युवकांचे विविध प्रश्न अक्षय कर्डिले यांनी हाती घेऊन सोडवावे. केंद्र व राज्य सरकारच्या युवकांसाठी विविध योजना असून त्यांच्यापर्यंत त्या पोहोचविण्याचे काम करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या पाठीवर देशाचे महत्त्व सिद्ध करून दिले आहे.

भारत देश युवकांचा देश म्हणून ओळखला जात असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहे. अक्षय कर्डिले यांना माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा जनसेवेचा वारसा लाभलेला आहे, त्यांनी तो पुढे चालवावा.

माजीमंत्री कर्डिले जनतेत जाऊन प्रश्न सोडवत असतात, त्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असतात. अक्षय कर्डिले यांना युवा मोर्चाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आहे.

ती त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून पार पाडावी. युवकांनी कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करावा असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

भाजपा युवा मोर्चाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अक्षय कर्डिले यांची निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खा. सुजय विखे पाटील, माजीमंत्री प्रा. राम शिंदे, माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे आदी उपस्थित होते.

युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष कर्डिले म्हणाले की, पक्षाने माझ्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी टाकली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडेल. युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल.

ग्रामीण भागातील युवकांचे विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू. माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून थेट जनतेपर्यंत जाण्याचे काम आम्ही करीत आहोत असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe