Amit Shah : सभा अमित शाह यांची, स्थानिकांना मात्र नोटिसा, नेमकं कारण काय?

Ahmednagarlive24 office
Published:

Amit Shah : भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापुरातील नागाळा पार्क येथे त्यांची सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्यात आली आहे. कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरातल्या अपार्टमेंट धारकांना पोलिसांकडून नोटिस देण्यात आली.

यामुळे याची कोल्हापूरमध्ये सगळीकडे चर्चा झाली. दुपारी विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या होत्या. शाहूपुरी पोलिसांनी ही नोटीस बजावली होती. अमित शहा यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही नोटीस बजावण्यात आली होती. या सभेत त्यांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागा जिंकू असे म्हटले आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करू, या असा संकल्प भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. दरम्यान ते म्हणाले, आज भारताने सर्व क्षेत्रात आघाडी घेतली आहे. करोना महामारीच्या कालावधीत देशवासीयांना आरोग्य विषयक सुविधा पुरवल्या.

विविध योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना समृद्ध भारताची निर्मिती हे ध्येय ठेवले. तसेच भाजप सोबत फसगत करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना येत्या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन ही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

2004 ते 2014 मधील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत बारा लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला, अशी तोफ शहा यांनी डागली. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe