Anil deshmukh : अनिल देशमुख यांच्याबाबत न्यायालयाने घेतला मोठा निर्णय, देशमुखांना मोठा दिलासा..

Ahmednagarlive24 office
Published:

Anil deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी जेलमधून सुटका झाली. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची सुटका झाल्यानंतर मात्र त्यांना मुंबई सोडून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती.

त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली होती. आता अनिल देशमुख यांना नागपूर व नवी दिल्लीत जाता यावे यासाठी चार आठवडे मुंबईबाहेर जाण्याची परवानगी विशेष न्यायालयाने दिली आहे. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने काही कामांसाठी तिथे जाणे आवश्यक आहे. तसेच वकिलांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीत जाण्याची आवश्यकता आहे. यासाठी परवानगी त्यांनी मागितली होती. अखेर त्यांना परवानगी मिळाली आहे.

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे ते जेलमध्ये होते.

त्यांची सुटका झाल्यानंतर जामिनाच्या आदेशांत उच्च न्यायालयाने देशमुख यांना अनेक अटी घातल्या होत्या. यामध्ये मुंबईबाहेर जायचे नाही, या अटीचाही त्यात समावेश होता. यामुळे त्यांनी बाहेर जाण्यासाठी रीतसर परवानगी मागितली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe