भाजपसोबत युती करण्याची सेना खासदारांची मागणी; उद्धव ठाकरे म्हणतात…

Published on -

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अखेरीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. याबाबत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी अधिक माहिती दिली आहे.

केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. नैसर्गिक युती करावी अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी पक्ष प्रमुखांना बैठकीत केली. भाजपसोबत युतीमध्ये असताना आलेले अनुभव आणि महाविकास आघाडीमध्ये आलेले अनुभव यात खूप फरक होता, असेही हेमंत गोडसे म्हणाले आहेत.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपला मदत करावी अशी आम्ही मागणी केली होती. पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असतील तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे असे आम्ही सांगितले. यावर विचार करू असे उद्धवजी म्हणाले होते, असे हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे.

खासदारांच्या मागणीवर उद्धव ठाकरेंनी विचार करू असे उत्तर दिल्याचे गोडसेंनी सांगितले आहे. आता खासदारांच्या या मागणीवर उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe