Balasaheb Thorat : काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा देखील दिला होता. यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद समोर आला होता. असे असताना आता दोन्ही नेत्यांनी सोबत पत्रकार परिषद घेतल्याने हा वाद मिटल्याचे समोर आहे.
बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोन्ही बड्या नेत्यांच्या उपस्थित पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

यावेळी नाना पटोले यांना थोरांतासोबत मनोमिलन झालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. मी सांगितलं की आमच्या काँग्रेस पक्षात कुठेही कुठलाही वाद नाही. नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी केलेलं एक वातावरण होतं, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
तसेच ते म्हणाले, बाळासाहेबांनी सुद्धा परवा सांगितलं की आमच्यात कुठलाही वाद नाही. पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला बाळासाहेब थोरातांनी नाराजीचं पत्र पाठवलं तर त्या पत्राची एक कॉपी तरी दाखवा. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र तर दाखवा, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचा अपघात झाला. एच. के. पाटील पहिल्यांदा मुंबईत आले तर त्यांच्या घरी गेले. ते सर्वच नेत्यांना भेटले. पण त्यांचा अपघात झाल्याने ते त्यांच्या घरी जाऊन भेटले. यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी गेले होते का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.