काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांचा महर्षी पुरस्काराने सन्मान !

थोरात यांनी मतदारसंघात अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. त्यांनी आपल्या विकास कामांमधून संगमनेर तालुक्याला महाराष्ट्रातील एक आदर्श तालुका म्हणून प्रस्थापित केले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य मंत्रिमंडळात महसूल, रोहयो, कृषी, पाटबंधारे, शालेय शिक्षण अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

Tejas B Shelar
Published:
Balasaheb Thorat

Balasaheb Thorat : अहमदनगर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात यांना नुकताच महर्षी पुरस्कार प्राप्त झाला आहे. थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पक्षाचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी अशी ओळख मिळाली आहे.

याच सहकाराच्या पंढरीत थोरात यांनी गेल्या 40 वर्षाच्या आपल्या सक्रिय राजकारणाच्या काळात सर्वच क्षेत्रात चांगली नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कृषी, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास या सर्वच क्षेत्रात त्यांची कामगिरी वाखाण्याजोगी आहे. हेच कारण आहे की गेल्या आठ टर्म पासून म्हणजेच तब्बल 40 वर्षांपासून ते संगमनेरचे प्रतिनिधित्व करत आहेत.

आजतागायत त्यांना या मतदारसंघात कोणीच टक्कर दिलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अशातच, आता आमदार बाळासाहेब थोरात यांना पुणे येथे झालेल्या नवरात्र महोत्सवात महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

थोरात यांनी मतदारसंघात अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. त्यांनी आपल्या विकास कामांमधून संगमनेर तालुक्याला महाराष्ट्रातील एक आदर्श तालुका म्हणून प्रस्थापित केले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य मंत्रिमंडळात महसूल, रोहयो, कृषी, पाटबंधारे, शालेय शिक्षण अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

त्यांनी पक्ष अडचणीत असताना पक्षाच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान देखील दिले आहे. त्यामुळे जेव्हाही महाराष्ट्र काँग्रेसचा विषय निघतो तेव्हा बाळासाहेब थोरात यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. त्यांनी अडचणीच्या काळात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळून पक्षाचा विस्तार केला आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या पहिल्या 21 सदस्यांमध्ये त्यांची निवड झालेली आहे. यावरून काँग्रेस पक्षातील त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. थोरात हे अहमदनगरच्या राजकारणातील एक सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांचा जनाधार हा फार मोठा आहे. त्यांचा हा जनाधार फक्त संगमनेर पुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यात त्यांची पकड आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नगर जिल्ह्यात जे यश मिळाले त्या यशात सर्वात मोठा वाटा हा थोरात यांचाच होता. राजकीय विश्लेषक थोरात यांच्यामुळेच नगर दक्षिण मध्ये मोठा उलट फेर पाहायला मिळाला असे आवर्जून नमूद करतात.

दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने आमदार बाळासाहेब थोरात यांचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. हा सन्मान देशाच्या पहिल्या नागरिक अर्थातच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

यानंतर आता, बाळासाहेब थोरात यांना राजकारणात अन समाजकारणात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल पुण्यातील नवरात्र महोत्सवाच्या वतीने त्यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी थोरात यांनी मला मिळालेला हा सन्मान तसेच पुरस्कार संगमनेर तालुक्यातील तसेच राज्यातील गोरगरीब जनतेचा असून आपण सदैव जनतेसाठी काम करत राहू अशी ग्वाही देखील दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe