बाळासाहेब थोरात यांनी घेतला संजय गायकवाडांचा समाचार; ‘आमदार गायकवाड तर नाथुराम गोडसे….’

काँग्रेससहित महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षातील नेत्यांनी गायकवाड यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटाच्या आमदाराचा खरपूस समाचार घेतला आहे. आमदार गायकवाड यांच्या या विधानामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अडचणीत आले आहेत. विरोधकांच्या माध्यमातून आमदार गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फैलावर घेतले जात आहे.

Tejas B Shelar
Published:
Balasaheb Thorat Vs Sanjay Gaikwad

Balasaheb Thorat Vs Sanjay Gaikwad : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशातच राहुल गांधी यांच्यावर आरोप करताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली आहे.

त्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी खूपच चुकीचे आणि अगदीच आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे आमदार गायकवाड अडचणीत आले आहेत. या प्रकरणावर भारतीय जनता पक्षाने स्वतःला अलिप्त केले आहे.

तसेच, काँग्रेससहित महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षातील नेत्यांनी गायकवाड यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटाच्या आमदाराचा खरपूस समाचार घेतला आहे.

आमदार गायकवाड यांच्या या विधानामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अडचणीत आले आहेत. विरोधकांच्या माध्यमातून आमदार गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फैलावर घेतले जात आहे.

संगमनेरचे आमदार आणि अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही गायकवाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. थोरात नाशिकला एका खाजगी कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली.

तसेच पोलीस प्रशासनाच्या कारभारावरही थोरात यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ऐन निवडणुकीच्या आधीच गायकवाड यांनी हे विधान केले असल्याने ते स्वतः तर अडचणीत आलेच आहेत शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडचणीत सापडले आहेत.

बाळासाहेब थोरात काय म्हटले?

बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी भाष्य करताना असे म्हटले आहे की, संस्कृती आणि गायकवाड यांचा कुठलाच संबंध दिसत नाही. गायकवाड यांच्यात नथुराम गोडसे दिसत आहेत. त्यांच्यात गोडसे यांचीच वृत्ती आहे. ते जे बोलले ते अत्यंत आक्षेपार्ह असून राज्य सरकारने कसलीही वाट न पाहता त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते.

हे एक गंभीर प्रकरण असून या प्रकरणाची पोलिसांनी देखील दखल घेणे आवश्यक होते. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, हे फारच चुकीचे असून याची खूपच खंत वाटत आहे. खरेतर, राहुल गांधी यांनी अमेरिकेत भाषण केले होते.

या भाषणात गांधी यांनी अतिशय समतोल आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ विधान केले होते. मात्र इंग्रजीचे सखोल ज्ञान नसणाऱ्या लोकांकडून त्यावर खूपच चुकीचं विधान करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढून अगदीच आक्षेपार्ह विधान करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe