Bhagatsingh koshyari : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादात अडकलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर याबाबत निर्णय झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने भगतसिंह कोश्यारी यांना मोठा दिलासा दिला आहे. भगतसिंह कोश्यारी यांचा महापुरुषांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता, अशी टिप्पणी करत न्यायालयाने त्यांच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे आता यावर हा वाद मिटणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांची ही वक्तव्ये कोणत्याही महापुरुषांचा अवमान करणारी नाहीत. म्हणूनच ही फौजदारी गुन्हा कायद्यानुसार दखल घेण्यासाठी पात्र ठरत नाहीत.
तसेच समाजाचे प्रबोधन करण हा भगतसिंह कोश्यारी यांचा हेतू होता. त्यांना कोणत्याही महान व्यक्तीचा अनादर करायचा नव्हता. राज्यपालांची वक्तव्य ही इतिहासाच्या विश्लेषणात्मक आहेत. असं निरीक्षण न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अभय वाघवासे यांच्या खंडपीठाने नमूद केले आहे.
दरम्यान, माजी राज्यपाल कोशारी यांनी केलेल्या अनेक वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात होती. यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर त्यांची बदली करण्यात आली होती. यामुळे हा वाद मिटला होता.