Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेच्या जागेने लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. येथे निलेश लंके हेच विखे यांना फाईट देतील असे लोक सध्या चर्चा करत आहेत. त्यात नुकतीच निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली व त्यातही त्यांनी लोकसभा निवसणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्यामुळे या चर्चाना जोर मिळाले. परंतु आता आ. निलेश लंके यांनी जे राजकीय वक्तव्य केले आहे त्याविण पुन्हा वेगळ्याच चर्चांना पेव फुटले आहे. लोकसभा निवडणूक लढवणारच, या राणी लंके यांच्या जाहीर वक्तव्याबद्दल ‘ध’ चा ‘मा’ झाला, असे स्पष्टीकरण स्वतः आमदार निलेश लंके यांनी दिलेय. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे मतप्रवाह असतात व तो पत्नी राणी लंके यांचा मतप्रवाह असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
नेमके काय म्हणाले आ. निलेश लंके ?
आ. निलेश लंके म्हणाले, माझी पत्नी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवणारच ही जी घोषणा केली त्या घोषणेचा उगाचच ‘ध’ चा ‘मा’ झाला आहे. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे मतप्रवाह दिसून येतातच की, तसाच तो आमच्याही घरात आहे.
पत्नी राणी यांचे ते वेगळे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट आहे. पुढे ते म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज्ञाधारक कार्यकर्ता असून पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर कोणतीही निवडणूक मी लढवू शकतो हे खरे आहे,
परंतु लोकसभेच्या माझ्या उमेदवारीबाबत मला विचारणाही झाली नाही व कोणाशी माझी चर्चाही झालेली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अर्थात काय तर लोकसभा निवडणूक लढवणारच ही घोषणा म्हणजे
राणी लंके यांचे स्वतःचे मत असल्याचे निलेश लंके यांनी यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला असेच म्हणावे लागेल.
महायुतीच्या मेळाव्याबाबत वक्तव्य
रविवार नगरमध्ये महायुतीचा मेळावा झाला. या मेळाव्यास ते हजर नव्हते. याबाबत त्यांना विचारले असते ते म्हणाले, यासंबंधी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचा आपल्याला फोन आला होता, पण त्यादिवशी मी बाहेर असल्याने मला त्या ठिकाणी जाता आले नाही.
माझ्याबद्दल कोणी काय भाष्य करावे हा त्यांचा प्रश्न असून कोणी काय केले, ते पाहण्यात वेळ खर्च न करता त्याकडे दुर्लक्ष करतो व माझ्या पद्धतीने मी काम करत असतो असे परखड वक्तव्य आ.लंके यांनी यावेळी केले.