BJP : मुलगी जन्मली की 50 हजार, शिक्षण मोफत, सिलिंडरही फ्री, भाजपने पाडला घोषणांचा पाऊस..

Published on -

BJP : सध्या देशाच्या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडचा समावेश आहे. मेघालय राज्यातील विधावसभेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपचा जाहीरनामा घोषित केला. यात ज्या घरात मुलगी जन्माला आली, त्या पालकांसाठी तसेच संबंधित मुलीच्या पालन-पोषणासाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे या घोषणा भाजपला विजय मिळवून देईल का हे येणाऱ्या काळात समजणार आहे.

आता जाहीरनाम्यात मुलगी जनेमली तर 50 हजार रुपयांचा बाँड केला जाईल. तसेच तिचे के जी ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाईल, असे आश्वासन दिले आहे. मेघालयात ७ वा वेतन आयोग लागू करणार असल्याचे देखील यामधून सांगितले आहे

तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे २,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत वाढवणार असे म्हटले आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थींना वर्षाला 2 एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील. युवकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन केले जातील.

तसेच रोजगाराच्या संधीदेखील वाढवल्या जातील, असेही यामधून सांगितले गेले आहे. दरम्यान, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांसाठी महत्त्वाच्या पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मेघालयची विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च रोजी बरखास्त होणार आहे.

याठिकाणी विधानसभेसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी भाजप, काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचा प्रचार देखील आतापासूनच सुरू करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe