BJP Chief Minister : भाजपचे ज्येष्ठ नेते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुपप्पा यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात त्यांना एक मोठा अनुभव होता. भाजपसाठी हा एक मोठा धक्का असणार आहे. राज्यात त्यांनी भाजपला चांगले दिवस आणले होते.
उद्या विधानसभेत ते शेवटचे भाषण देणार आहे. काल ते माध्यमांशी बोलताना भावुक झाले होते. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद चार वेळा भूषवले होते. ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत येणार आहे.

भाजपला सत्तेत आणण्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येदुरप्पा नाराज असल्याची चर्चा गेल्या महिन्यात रंगली होती. मात्र कालच्या भाषणात त्यांनी याबाबत काही वक्तव्य केले नाही.
दरम्यान, ते आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नसले तरी भाजपचे कर्नाटकामधील मोठे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने मला दिलेल्या सन्मान मी आयुष्यभर विसरु शकणार नाही.
विधानसभेत शुक्रवारी माझा शेवटचा दिवस असेल, त्यानंतर मी येथे येऊ शकणार नाही, मला भाषण देता येणार नाही, असे सांगताना ते भावुक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, सध्या नाराज येदियुरप्पा यांची नाराजी दूर करीत लिंगायत समाजाला आकर्षित करण्यासाठी येदियुरप्पाशिवाय भाजपला दुसरा पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.
भाजपला याठिकाणी पुन्हा सत्तेत येण्यासाठी लिंगायत वोट बँक महत्वाची आहे. त्यासाठी बीएस येदियुरप्पा यांच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला होणार आहे. यामुळे त्यांच्याशी भाजपला जुळवून घ्यावेच लागणार आहे.