Kasba by-election : पुण्यात सध्या पोट निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. असे असताना भाजपला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील भाजपच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नेत्याने निवडणुकीच्या प्रचारातून माघार घेतल्याने भाजपचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्याचे खासदार गिरीश बापटांची प्रकृती खराब आहे. त्यामुळे प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, गिरीश बापटांनीच पत्राद्वारे याबाबत दिली आहे. यामुळे भाजपला ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

कसबा मतदारसंघात बापट हे किंगमेकर आहेत. याठिकाणी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. यामुळे त्याची कमी भाजपला जाणवणार आहे. मुक्ता टिळकांच्या निवडणुकीच्या वेळीदेखील त्यांची प्रचारात महत्वाची भूमिका होती.
असे असताना मात्र पोट निवडणुकीच्या वेळी त्यांनी आजारपणाचे कारण देत घरोघरी जाऊ शकत नाही, असे सांगत माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता भाजपचे टेन्शन वाढणार आहे.
दरम्यान, कसब्याचे टेन्शन घेऊ नका नक्की आपणच जिंकू, असा विश्वास बापटांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला होता. मात्र आता त्यांनी प्रचारातून माघार घेतली आहे. त्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे.
यामुळे सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान भाजपने केंद्रीय मंत्री अमित शहा यांना देखील बोलावले आहे. तसेच भाजपचे अनेक मंत्री पुण्यात तळ ठोकून आहेत.