भाजपने लोकसभेचा धसका घेतला; थोरातांच्या बालेकिल्ल्यात गुजरातचे पथक दाखल !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Politics : भाजपाने लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव चांगलाच मनावर घेतला असल्याचे दिसत आहे. कारण नुकतीच नाशिकमध्ये भाजपची एक नियोजन बैठक झाली.

त्या बैठकीत गुजरातमधील काही नेते उपस्थित होते. या बैठकीतच अहमदनगर बाबत देखील चर्चा करण्यात आली असून त्याबाबत नियोजन देखील करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मतदारसंघासाठी एका आमदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता हे आमदार आतापासूनच मतदारसंघात मुक्काम ठोकून नियोजनाचे काम करणार आहेत. तसेच याबाबतची माहिती वेळोवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीच्या ताब्यातून गेल्या त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच सावध पवित्रा घेत तशी रणनिती आखण्यास येत आहे. याच पार्शवभूमीवर गुजरामधील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची टीम नगर जिल्ह्यात दाखल झाली आहे.

आमदार जगदीश मकवाणा आणि आमदार किशोरीलाल बेनिवाल आणि त्यांचे सहकारी या टीममध्ये सामील आहेत. पुढील दोन महिने हे सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ आणि अकोले मतदारसंघातील संघटनात्मक कामाला गती देण्याचे काम ते करणार आहेत.

लोकसभेचा अनुभव लक्षात घेता महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने आणखी जोर लावण्याचे धोरण स्वीकारले आहे. अलीकडे संगमनेर हा थोरातांचा असलेला मतदारसंघ भाजपच्या विखे विखे पाटील यांनी प्रतिष्ठेचा केला असून आपण संगमनेर किंवा राहुरीतून निवडणूक लढवू शकतो, असे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच त्यादृष्टीने विखे पिता पुत्राने संगमनेरमध्ये कार्यकर्ता मेळावा देखील घेतला आहे. तर संगमनेर हा जरी बाळासाहेब थोरात यांचा हा मतदारसंघ असला तर यावेळी त्यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी मतदारसंघ आहे. मात्र, तेथे थोरात यांनी लक्ष घातले आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe