आगामी काळात राज्यात भाजप मोठे यश मिळवेल- जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आ. रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुंबईत त्यांचे कौतुक करुन सदिच्छा दिल्या.

Published on -

Ahilyanagar News: शिर्डी- विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकासित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भारतीय जनता पक्ष अधिक मजबूतीने काम करून मोठे यश मिळवेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आ. रविंद्र चव्हाण यांची निवड झाल् याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुंबईत त्यांचे कौतुक करुन सदिच्छा दिल्या आहे. यावेळी ते बोलत होते. आ. रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून संघटनात्मक अनुभव असलेले नेतृत्व प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन सदिच्छा

आ. रविंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. कल्याण डोंबिवली महानगर पालिका आणि डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार म्हणून त्यांनी विजयाची घोडदौड सुरु केली. सलग चार वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व ते करीत आहे. सार्वजनिक जीवनात विकास कामांच्या प्रक्रीयेला पुढे जाण्याचा मोठा अनुभव तसेच एक कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची राहिलेली संघटनात्मक वाटचाल सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

रविंद्र चव्हाण यांचे भाजपाला मोलाचे मार्गदर्शन

महायुती सरकारमध्ये विविध मंत्री पदांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी नागरी हिताचे निर्णय घेतले. यामध्ये प्राधान्याने राज्यातील रस्ते विकासामध्ये त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले. सरकार आणि संघटना यातील योग्य समन्वय साधण्याचा अनुभव आ. रविंद्र चव्हाण यांच्या पाठीशी असल्याने राज्यात भाजपाच्या संघटनात्मक कामाला त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. 

आगामी काळात भाजप मोठे यश मिळवेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य करीत असलेल्या विकासात्मक वाटचालीला संघटनेच्या माध्यमातून भक्कम असे पाठबळ उभे करून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही विधानसभेप्रमाणेच भारतीय जनता पक्ष प्रथम स्थानावर यश मिळवेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!