Maharashtra Politics : पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये खासदारकीच्या सर्वच ४८ जागा निवडून आणणार आहे. त्यासाठी भाजपची संघटनात्मक बांधणी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विश्वकर्मा योजना या विविध विकास योजनांच्या माध्यमातून देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा साताऱ्याचे संपर्क प्रभारी अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे प्रभारी, माजी खा. अमर साबळे, डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, शहराध्यक्ष विकास गोसावी, सचिव विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते.
मंत्री मिश्रा म्हणाले, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भारताच्या नव्या संसद भवनामध्ये महिला आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जी २० परिषद आणि १३ हजार कोटीची महत्त्वकांक्षी विश्वकर्मा योजना यामुळे भारताने देशातील विविध विकास योजनांना गती दिली आहे.
जी २० परिषदेच्या माध्यमातून भारताने आपली संस्कृती आणि परंपरा यांची ओळख जगाला घडवून दिली. विश्वशांती, विश्वकल्याणाच्या दृष्टीने भारत हे एक प्रमुख केंद्र असल्याची जाणीव या परिषदेमुळे झाली.
योग्य व्यक्तीला उमेदवारी
सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहरा कोणता असणार, या प्रश्नावर मंत्री मिश्रा म्हणाले, साताऱ्यामध्ये संघटन मजबूत असून येथे उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. अद्याप वरिष्ठ कार्यकारिणीची बैठक झालेली नाही. ज्यावेळी बैठकीच्या माध्यमातून योग्य व्यक्तींचे निर्णय होतील, त्यावेळी ही नावे जाहीर केली जातील.