Bjp In Maharashtra : १८ लोकसभा मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष राहणार !

Ahmednagarlive24 office
Published:
Bjp In Maharashtra

Bjp In Maharashtra : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील १८ मतदार संघामध्ये भाजप- महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.

या मतदार संघावर विशेष लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव तथा बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर यांनी दिली.

नगर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पडळकर म्हणाले की, भाजपची लोकसभा निवडणुकीची पक्षीय पातळीवर तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महाजनादेश २०२४ यात्रा लवकरच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश २०२४ यात्रा लवकरच सुरू केली जाणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदार संघामध्ये एक जाहीर सभा होणार आहे. विश्वकर्मा योजनेंतर्गत गावपातळीवरील बारा बलुतेदारांसाठी १३ हजार कोटींचे कर्ज व्यवसायासाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe