आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यात भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर, ६३ पदाधिकाऱ्यांचा समावेश

Published on -

राहाता- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या राहाता मंडलाच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी भाजप राहाता मंडळाची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे.

या कार्यकारिणीची रचना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून यात एकूण ६३ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. कार्यकारिणीत दोन सरचिटणीस, सहा उपाध्यक्ष, सहा चिटणीस, एक कोषाध्यक्ष, पंधरा कार्यकारिणी सदस्य, सात मोर्चा अध्यक्ष आणि २६ प्रकोष्ठ संयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरचिटणीसपदी सचिन भैरवकर व किरण चोळके यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी संतोष सदाफळ, अंकुश भडांगे, कालिंदी भवर, ज्ञानेश्वर तुरकणे, गोवर्धन सरोदे व किरण सालपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीस म्हणून रवींद्र आगलावे, चेतन गाडेकर, बाळासाहेब सापते, भाऊसाहेब भांबरे, रवींद्र गुंजाळ आणि पंकज गोर्डे यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी पंकज कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

भाजपच्या विविध मोर्थ्यांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा- सागर कापसे, महिला मोर्चा- शोभाताई घोरपडे, किसान मोर्चा – विनायकराव जपे, ओबीसी मोर्चा- शरद गायकवाड, अनुसूचित जाती मोर्चा- जॉन- त्रिभुवन, अनुसूचित जमाती मोर्चा – पुनीत बर्डे व अल्पसंख्यांक मोर्चा- आरिफ तांबोळी यांची निवड झाली आहे.

तसेच प्रकोष्ठ संयोजक म्हणून उद्योग आघाडी- प्रवीण देवकर, व्यापार आघाडी- प्रवीण वाकचौरे, उत्तर भारतीय आघाडी- साईकुमार गौड, दक्षिण भारतीय आघाडी- सोमेश वेलंगर, भटके विमुक्त आघाडी- चेतन रणमाळे, वैद्यकीय आघाडी- डॉ. अमोल बेंद्रे, कायदा आघाडी- अॅड. अतुलकुमार मालवदे, सहकार आघाडी राजेश सदाफळ, मच्छिमार आघाडी- सिताराम आहेर, ट्रान्सपोर्ट आघाडी- सागर घोगळ, सोशल मीडिया सेल-गणेश आरणे, माजी सैनिक सेल- रंजयकुमार सुलाखे, सुलाखे, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल- अशोकराव जमधडे, दिव्यांग सेल- सचिन पोटे, बुद्धिजीवी सेल- राजेंद्र निकाळे, शिक्षक सेल माधव चौधरी, आध्यात्मिक आघाडी विकास महाराज यादव, पदवीधर प्रकोष्ठ- नवनाथ शिरोळे, क्रीडा आघाडी- अॅड. गौरव बोर्डे, जैन आघाडी-रवींद्रकुमार कर्नावट, सांस्कृतिक सेल- शिल्पा कातोरे, आयटी सेल – प्रशांत डांगे, आयुष्यमान भारत सेल- अश्विनी बोठे, बेटी बचाव बेटी पढाव सेल- संदीप गाडेकर, पंचायत राज व ग्रामविकास सेल- अर्चना डांगे, राजस्थान आघाडी- खेतदान जीबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून बालमभाई सय्यद, मनीषा चांगले, उत्तम हेंगडे, अजय रोहोम, दिपाली कान्होरे, भाऊसाहेब काळे, जयश्री वाणी, श्रुती चौधरी, वाल्मिक मोरे, विलास गोल्हार, प्रतिभा साळुंखे, सागर कातोरे, अनिल डांगे, हर्षल सातव आणि दर्शन गाढवे यांची निवड झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!