Sharad pawar : दिल्लीत रात्री राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महत्त्वाच्या विषयांवर खलबत होत असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी अनेक बडे नेते उपस्थित होते. यामुळे यामध्ये काय ठरलं यावरून पुढील राजकारणाची दिशा समजणार आहे.
देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. लोकसभेनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या दोन्ही निवडणुका महाराष्ट्रातील सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला देखील लागले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यासाठी विरोधी पक्षांकडून मोठी रणनीती आखली जात आहे. यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे यामध्ये विरोधक रणनीती आखत आहेत.
ईव्हीएमबाबत ही बैठक होणार आहे. सगळ्या विरोधी राजकीय पक्षांना निमंत्रण दिले आहे. अशी माहिती सुनील तटकरे यांनी आधीच दिली. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, जेडीयूकडून अनिल हेगडे, डी राजाराम गोपाल यादव, बीआरएसचे केशव राव, सीपायएमचे एल राम करीम, अनिल देसाई उपस्थित होते.