मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

Published on -

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेवर नाराज असलेल्या आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला होता. अनेक बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबाबत अनेक तक्रारी देखील केल्या. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात भाजपसोबत युती करत शिंदे सरकार स्थापन झाले.

राज्यात विशेष अधिवेशन सुरु असताना सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पहायला मिळाल्या. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीसोबत काम करु नये असा सल्ला दिला तर एकीकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत असतानाच एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमागचं कारण नेमकं काय? या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल?, असा प्रश्न पडला आहे. एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या या भेटीवरुन अनेक चर्चांना उधाण आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe