Chief Minister : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री झाल्यापासून आपली ओढाताण होत असून, या दरम्यान आपले १० किलो शारीरीक वजन घटल्याचे सांगितले. यामुळे आता सोशल मिडीयावर एकच चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांचे तब्बल १० किलो वजन घटल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री शिंदे आणि बापट यांच्यात दीर्घ चर्चा झाली. विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा यावेळी झाल्या. यावेळी शिंदे यांनी आपल्या शारीरीक वजन घटल्यावरून सांगितले.

असे असताना आता यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदेना चिमटा काढला आहे. नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे चांगले मित्र आहेत.
तसेच यापूर्वी शिंदेना काही टेंशन नव्हते. ते जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा त्यांचे वजन वाढत जात होते, असा टोला त्यांनी शिंदे यांना लगावला आहे. शिंदे यांनी जाहीरपणे सांगितले की, ते मोदी आणि शाह यांचे हस्तक आहेत.
आता देशाचे टेन्शनच नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. तसेच अमित शहा आणि मोदी यांच्या टेन्शनमुळेच एकनाथ शिंदे यांचे वजन कमी झाले हेच त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता शिंदे यावर काय उत्तर देणार हे लवकरच समजेल.