Ahmednagar News : प्रवरा धरण समूहातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन रविवारपासून सुरू करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.
लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची होत असलेली मागणी लक्षात घेऊन सात दिवसांचे आवर्तन सोडण्याबाबात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवर्तनाचे नियोजन रविवार दि. ५ नोव्हेंबरपासूनच करण्याच्या सूचना दिल्या.

या आवर्तनामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा या लाभक्षेत्रातील तालुक्यांना मोठा दिलासा मिळेल. यापूर्वी जलसंपदा विभागाने १ ते ८ ऑगस्ट २०२३ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले होते.
पावसाअभावी शेती पीकांना दिलासा देण्यासाठी ९ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरपर्यंत शेतीच्या पाण्याच्या आवर्तानाचे नियोजन जलसंपदा विभागाने केले होते.
यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिल्याने उपलब्ध पाणी साठ्यानुसारच आवर्तनाचे नियोजन करण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या सूचनेनंतर भंडरादारा धरणातून रविवारी सकाळी आवर्तन सोडण्याचे नियोजन विभागाने सुरू केले असल्याने अभियंता काळे यांनी सांगितले.