‘विझणार कधीच अंगार नाही’ म्हणत मुख्यमंत्र्यांचे गुरूपौर्णिमेला बाळासाहेबांना विनम्र अभिवादन

Published on -

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड पुकारले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात सत्तांतर झाल्याने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांसहित एकनाथ शिंदेंवर वारंवार टीका केली जात आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आपण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात असल्याचा युक्तिवाद करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलं आहे. तसंच बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच असं सांगत अप्रत्यक्षपणे आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे.

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो या ट्विटमध्ये पोस्ट केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe