CM of Maharashtra : राज्यात अनेक घडामोडींनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 40 आमदारांचे समर्थन होते. असे असताना आता याच चाळीस पैकी एका आमदाराने आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
यामुळे आता याची एकच चर्चा रंगू लागली आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमरावतीतील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बोलून दाखवलं आहे.
यामुळे आता एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अगोदर मंत्रीपदासाठी ते आग्रही होते, आता थेट मुख्यमंत्री पदावरच त्यांनी इच्छा बोलून दाखवली आहे.
तुम अगर मुख्यमंत्री बनना चाहते हो, तो हम भी मुख्यमंत्री बनना चाहते है!, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता शिंदे गटातील इतर नेते काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या 2024 मध्ये कोण मुख्यमंत्री होणार यावर अनेक वक्तव्य केली जातात.
शिवाय वारंवार गद्दारीच्या केल्या जाणाऱ्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, आमचा एक स्वतंत्र पक्ष आहे. आम्ही कुठेही जाऊ. आम्हाला स्वतंत्र आहे. यामुळे तो आमचा अधिकार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणू नका, असं म्हणत बच्चू कडू यांनी विरोधकांना ठणकावलं आहे. काही दिवसांपूर्वी कडू यांची गाडी एका आजोबांनी आडवली होती. तसेच तुम्ही गद्दारी का केली, असाही प्रश्न त्यांनी विचारला होता. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.