१३ फेब्रुवारी २०२५ पारनेर : खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी (११ फेब्रुवारी) संसदेत बोलताना अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात जलजीवन मिशन योजने अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या तब्बल १३३८ कोटी रुपये खर्चाच्या ८३० पाणी योजनांच्या कामांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच केंद्रीय समितीमार्फत या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी या वेळी केली.पाणी योजनांच्या गैरप्रकारांबद्दल बोल्ट असताना त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून म्हटले कि,पाणी हे निसर्गाचे वरदान आहे, ते जपून वापरण्याचा सल्ला महात्मा गांधीजींनि दिला.केंद्र शासनाने ‘हर घर नल, और हर घर जल’ अशी घोषणा देत अतिशय महत्वपूर्ण जलजीवन मिशन योजना राबवली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या पाणी योजनांच्या कामांवर देखरेख केली जाते.अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात जलजीवन मिशन योजनेबरोबरच जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी योजनांवर ३ हजार २०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
या योजनांची कामेही अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असून,त्याची केंद्रीय समितीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी खा. लंके यांनी केली.लोकसभेत गेल्यानंतर खासदार लंके हे जलजीवन योजन मिशन योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या पाणी योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराकडे सातत्याने लक्ष वेधून घेत आहेत.
खा. लंके यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा विकास संनियंत्रण समितीच्या, जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीतही या भ्रष्टाचाराकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. हि आक्रमक भूमिका घेऊन खा. लंके यांनी जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच थेट आव्हान दिले. या पार्श्वभूमीवर खा. लंके यांनी संसदेमध्ये पुन्हा या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधले आहे.