मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त आज शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी अग्रदूत बंगल्यावर गेल्या आहेत. यावेळी त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच शिंदे साहेबांना भेटणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत आणि उद्धव ठाकरेही जाणार आहेत. मग आजच्या चांगल्या दिवशी का एक चांगली सुरवात व्हायला हवी अशी माझी खूप इच्छा आहे, असे दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
शिंदे साहेब तुम्ही मातोश्रीवर पुन्हा या एखदा उद्धव साहेबांशी बोला सगळ नीट होईल, अशी विनंती केली असल्याची माहिती दिपाली सय्यद यांनी दिली आहे.
राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिंदे आणि ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. हा कुठे तरी चांगला मध्यस्थ आलेला आहे. ही सुरवात झालेली आहे याचा शेवटही चांगला होईल, असेही दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.