Ahmednagar News : वडगाव गुप्ताच्या सर्वांगिण विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही भाजपचे खासदार सुजय विखे यांनी दिली.
वडगाव ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांचा खा. विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, सत्कारप्रसंगी खा. विखे यांनी विकासाबाबत सूतोवाच केले.
यावेळी सरपंच सोनुबाई विजय शेवाळे, सदस्य बाळासाहेब गंगाधर डोंगरे, आशाबाई दत्तात्रय शेवाळे, बाळू धोंडीराम शिंदे, विजय मुरलीधर शेवाळे, ज्ञानदा शिवाजी घाडगे, डोंगरे उमेश अशोक, सुवर्णा दत्तात्रय आंबेडकर,
योगेश मच्छिद्र निकम, सुनिता बाबासाहेब गव्हाणे, मिराबाई रावसाहेब डोंगरे, हुसेन गुलाब सय्यद, जिजाबाई प्रल्हाद डोंगरे, मिराबाई राजेंद्र शेवाळे आदी विजयी उमेदवारांचा सन्मान करण्यात आला.
खा. विखे पुढे म्हणाले की, वडगाव गुप्ता गावासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी जी विकासाची वाटचाल सध्या सुरू आहे ती अशीच निरंतर चालू राहील.
मतदारांनी टाकलेल्या विश्वासास तडा जावू न देता विकासकामे मार्गी लावावीत, पदाधिकारी हे जनतेचे सेवेक आहेत, सेवकांनी जनतेची प्रामाणिकपणे समाजसेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी जालिंदर डोंगरे, शामराव पिंपळे, भिमराज गव्हाणे, बाळासाहेब डोंगरे, एकनाथ मोरे, नारायण शिंदे, बाबासाहेब गव्हाणे, हरीभाऊ शेवाळे, रामबाबा शेवाळे, डॉ. बापू पवार, भिमराज डोंगरे, बापु गव्हाणे, बाळू गव्हाणे,
सुजित डोंगरे, पुजा डोंगरे, अशोक शेवाळे, विकास शेवाळे, अनिल शेवाळे, अशोक आंबेडकर, दत्तात्रय शेवाळे, रावसाहेब घाडगे, शिवाजी घाडगे, गोरक्षनाथ शेवाळे, देवीदास डोंगरे, रंगनाथ गिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.