मुख्यमंत्री शिंदे अन अजितदादा यांच्या गैरहजेरीत फडणवीसांचे जोरदार भाषण, नगरच्या भाषणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात; देवेंद्रजी बोललेत तरी काय ?

सुरुवातीला या योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे तिन्ही नेते उपस्थित राहत असत. मात्र अधूनमधून या तिन्हीपैकी एखाद्याची दांडीही पाहायला मिळत असे. दरम्यान काल शिर्डी मध्ये झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही गैरहजर होते.

Tejas B Shelar
Published:
Devendra Fadnavis News

Devendra Fadnavis News : नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती सरकार आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आपल्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेला केंद्रस्थानी ठेवत महिला सशक्तिकरणाचे कार्यक्रम संपूर्ण राज्यभर चालवत आहे.

काल अर्थातच 27 सप्टेंबरला हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे संपन्न झाला. खरंतर ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. पण जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासूनच याची चर्चा आहे. महायुती सरकारची आतापर्यंतची सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणून या योजनेला ओळखले जात आहे.

मात्र या योजनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या तिन्ही घटक पक्षांच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात आला आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून लाडकी बहीण योजना असे नाव फ्लेक्सवर झळकवत अनेकदा या योजनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सुरुवातीला या योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे तिन्ही नेते उपस्थित राहत असत. मात्र अधूनमधून या तिन्हीपैकी एखाद्याची दांडीही पाहायला मिळत असे. दरम्यान काल शिर्डी मध्ये झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही गैरहजर होते.

फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यामुळे फडणवीस आपल्या भाषणात या योजनेबाबत काय बोलणार याकडे उपस्थितांचे विशेष लक्ष होते. मात्र कालच्या या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य केले नाही आणि योजनेचा श्रेय घेण्याचाही प्रयत्न झालेला पाहायला मिळाले नाही. कालच्या भाषणात ते फक्त आणि फक्त योजनेबाबत बोललेत.

फडणवीस काय म्हणालेत?

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहेत.

उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाणार आहे. राज्यातील एकाही पात्र भगिनींला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी दिली. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना महिला विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही.

त्यादृष्टीने केंद्र शासनाने लाडली बहीण, लखपती दीदी योजना आणली. राज्यातील १ कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लेक लाडकी योजना आणण्यात आली. यात मुलींना वयाची १८‌ वर्ष पूर्ण झाल्यावर एक लाख रूपये मिळणार आहेत.

लाडकी बहीण योजनेतून मिळणारी रक्कम नवरात्र काबाडकष्ट करणाऱ्या महिला भगिनींसाठी नक्कीच मोलाची ठरणार आहे असं म्हणतं योजना पुढे देखील सुरू राहील आणि या योजनेच्या पैशांमध्ये वेळोवेळी वाढ केली जाईल अशी माहिती यावेळी दिली. खरंतर या योजनेवरून भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गटात नेहमीच श्रेयवादाची लढाई पाहिल्या मिळाली आहे. पण काल योजनेच्या कार्यक्रमात एकटे फडणवीस उपस्थित असतानाही त्यांनी या योजनेचे श्रेय एकट्याने घेतले नाही.

याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे आजारपणामुळे येऊ शकले नाहीत, पण त्यांनी त्यांचा नमस्कार तुमच्यापर्यंत पोहचविण्यास मला सांगितले आहे, असे फडणवीस म्हणालेत. यामुळे सध्या फडणवीस यांच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात आणि राजकीय विश्लेषकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe