Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या संमतीमुळे मला कारागृहात टाकण्यासाठी जंगजंग पछाडण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. खोटी कागदपत्रे तयार गेली होती. परंतु मी कुठेच अडकणार नव्हतो. या सर्व गोष्टी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होत होत्या, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आज अनेक गौप्यस्फोट केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, पोलीस विभागात माझे अनेक मित्र आहेत, त्यांच्यांकडून ही माहिती मला मिळत होती. त्यासाठी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाब आणला गेला.

असे असताना या दबाबानंतरही कोणीही अधिकारी तयार झाले नाही. कारण खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी काही मागचे पुढचे खरे हवे असते. परंतु माझे काहीच नव्हते, असेही फडणवीस म्हणाले.
तसेच पहिले गृहमंत्री जेलमध्ये गेले. आणि दुसरे असे करु शकणार नाही. यामुळे यासंदर्भात १०० टक्के माहिती तत्कालीन मुख्यमंत्र्यांना होती, या आदेशांना त्यांची समंती होती, असा आरोप त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. तसेच त्यांनी अजित पवार, शरद पवार यांच्यावर पहाटेच्या शपथविधीबाबत देखील धक्कादायक खुलासे केले आहेत.