Devendra Fadnavis : आज राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झाले होते त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असे खळबळजनक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यामुळे एकच चर्चा सुरू आहे. तसेच फडणवीस म्हणाले, सर्वात मोठा विश्वासघात हा पवारांनी नाहीतर उद्धव ठाकरे यांनी केल्याचे सांगितले. माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला, असेही ते म्हणाले. 2019च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काही तासांचे सरकार स्थापन झाले होते.
विशेष म्हणजे भल्या पहाटे या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला होता. फडणवीस म्हणाले, माझ्यासोबत विश्वासघात दोन वेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही.
नंतर मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. असा गौप्यस्फोट त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा सुरु होती.
ती चर्चा पुढे जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. याचदरम्यान आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यामुळे आता यावर अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवंय. म्हणून आपण सरकार तयार करुया. त्यामुळे आम्ही निश्चय केला की चला ठिक आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती, असेही फडणवीस म्हणाले.