Dhananjay Munde : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस नोकर भरती कारभार सुरु असल्याचे उघड झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मुंडे यांच्या लिपिकाच्या नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र देण्यात आल्याचे आढळले आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना अटक देखील केली आहे. याबाबत आता चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये अजून किती लोकांचा सहभाग आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.

बोगस लिपिक भरती रॅकेट प्रकरणी गोवंडी पोलिसांनी मंत्रालयातील एक कर्मचारी तसेच अन्य तीन व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकर या तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच निखिल माळवे याला अटक करण्यात आली आहे.
आता त्यांच्याकडून तपास केला जात आहे. यामध्ये आता राजकीय नेत्यांच्या सहभाग आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यशवंत लक्ष्मण कदम यांनी यासंबंधीची तक्रार दिली आहे.
याबाबत कदम यांनी बचतीचे सर्व पैसे मिळून निखिल माळवेला एकूण ७ लाख ३० हजार रुपये दिल्याची तक्रार केली आहे. यामुळे आता यामध्ये अजून कोणती नावे पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस सध्या याबाबत तपास करत आहेत.