राजेश परजणे यांना विखे पाटील यांनीच उभे करून कोल्हे यांना पाडले का ? पाच वर्षानंतर स्वतः परजणे यांनी केला खुलासा, चर्चांना उधाण

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आता आगामी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी आता पुन्हा एकदा सर्वपक्षीय लोकांना एकत्रित करण्यास सुरवात केल्याचे दिसते.

म्हणजेच विखे पाटील पुन्हा या विधानसभेला मार्जीतल्याच लोकांना निवडणून आणणार का? अशी चर्चा रंगली आहे. विखे पाटील यांनी कोपरगावचा दौरा केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, परजणे, वहाडणे यांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु केले.

कोपरगाव मधील कार्यक्रमात विखे पाटील यांनी ज्या राजकीय टीका केल्या, किंवा ज्या पद्धतीने राजकीय वक्तव्ये केली त्यानुसार मंत्री विखे पाटील ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ म्हणत पुन्हा एकदा ‘मर्जी’तल्या लोकांनाच पुन्हा निवडून आणणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

* विखे पाटील यांचा दौरा विकासकामांसाठी की आगामी रणनीती?

विखे पाटील यांनी कोपरगाव मतदार संघात केलेला दौरा त्यातल्या त्यात आ. काळे यांचा माहेगांव देशमुख व महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या संवत्सर गावचा दौरा विशेष लक्षवेधी ठरला. संवत्सर येथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे भूमीपूजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संवत्सर,

कान्हेगांव, वारी या रस्त्याच्या दर्जोन्नतीकरण कामाचा प्रारंभ पालकमंत्री विखे यांनी केला. परंतु या कार्यक्रमातून त्यांनी आमदार आशुतोष काळे हेच आमदार होतील असं सांगितलं. तर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी विकासाच्या मुद्द्यावर काळे,

परजणे, वहाडणे, कोयटे सर्वजण एकत्रित काम करतील असं यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे हा विखे पाटील यांचा दौरा विकासकामांसाठी की आगामी रणनीती आखण्यासाठी होता अशी चर्चा रंगली आहे.

* राजेश परजणे यांना विखे पाटील यांनीच उभे करून कोल्हे यांना पाडले का?

राजेश परजणे यांना विखे पाटील यांनीच उभे करून कोल्हे यांना पाडले व काळे यांना निवडून आणले असा आरोप केला जातो. परंतु यावर आता स्वतः परजणे यांनी वक्त्यव्य केले आहे. ते म्हणालेत की, माझ्या भूमिकेमुळे अनेकांचा संभ्रम झालाय आणि त्याचाच त्रास मंत्री राधाकृष्ण विखे यांना सहन करावा लागला आहे असे स्पष्ट वक्तव्य परजणे यांनी केले.

परंतु आता आगामी काळात विकासाच्या मुद्द्यावर काळे, परजणे, वहाडणे, कोयटे सर्वजण एकत्रित काम करू असे म्हणत पुन्हा एकदा वेगळ्याच राजकीय गणिताचे संकेत दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe